Saturday, December 31, 2011

अमेरिकेतील गरीब शहरे!


खांब आहे पण दिवा नाही!



अमेरिकेतील काही छोटी शहरे सध्या गरिबी अनुभवत आहेत! लहानलहान शहरांचे उत्पन्नाचे स्त्रोत आटल्यामुळे बजेटवर विपरीत परिणाम होऊन खर्चाला कात्री कोठे लावता येईल याचा गंभीरपणे विचार अशा शहरांच्या कॊन्सिल्सना करावा लागत आहे. ऑफिस स्टाफ कमी करणे, सार्वजनिक सोयी-सुविधांवर खर्च न करणे, पार्क्सकडे कमीजास्त दुर्लक्ष करणे अशा अनेक गोष्टी वाचनात आल्या होत्या. मोठ्या शहरांनाही कमीजास्त प्रमाणात या प्रष्नांना तोंड द्यावे लागत आहे व त्याचे परिणामही दिसून येतात.
आजची बातमी अशी कीं काही लहान शहरांनी काटकसर करण्यासाठी गावातील रस्त्यावरचे दिवे कमी केले आहेत! वीज कंपनीची बिले थकवून झाली तरी भागत नाही मग काय करणार? Highland Park शहरात १६०० पैकी ११०० दिवे बंद केलेले आहेत. बंद म्हणजे नुसते स्वीच ऑफ नव्हेत तर खांबासकट काढून टाकले आहेत! गाव लहान आहे पण गावातील माणसे संध्याकाळ होण्यापूर्वी घरी परततात कारण रस्त्यांवर काळोख असतो. चर्चमधील बायबल स्टडी चा कार्यक्रम संध्याकाळी ७ ऐवजी ४ वाजता सुरु होतो. मोटारवाल्यांची तक्रार आहे कीं आम्हाला पादचारी दिसत नाहीत! नागरिकाना सांगण्यात येते कीं तुमचे पोर्च वरील लाईट चालू ठेवा!
इतरही काही छोट्या शहरांची नावे बातमीत आली आहेत. Myrtle Creek, Ore., Clintonville, Wis., Brainerd, Minn., Santa Rosa, Calif., and Rockford, Ill. ही इतर काही शहरांची नावे! Rockford ने १४,००० पैकी २,३०० दिवे बंद केले आहेत.
इतर काटकसर नागरिकांच्या चटकन लक्षात येत नाही पण दिवे बंद झालेले लगेच दिसून येतात. मग ’माझ्या रस्त्यावर दिवे नाहीत तर अमुक ठिकाणी कां आहेत?’ अशा तक्रारीही उद्भवतात. एकंदरीत काय कीं गरिबीचे चटके सगळीकडे सारखेच.

No comments:

Post a Comment