Friday, December 30, 2011

अन्याय! अन्याय!!

अन्याय! अन्याय!! पण उशिराने न्याय!
DNA Testing प्रचारात आल्यापासून अमेरिकेत अनेक जुन्या क्रिमिनल केसेस पुन्हा तपासल्या जात आहेत आणि काही केसेसमध्ये निर्दोष व्यक्तीला शिक्षा झाल्याचे उघडकीला येत आहे. Innocence Project नावाची एक संस्थाच यासाठी चालवली जाते जी जुन्या केसेस, जेथे अन्याय झाल्याचा दाट संशय आहे अशा बाबतीत कोर्टात अर्ज करून पुन्हा तपासणी करण्याची मागणी करते. आरोपीची DNA तपासणी केल्यावर काही वेळा त्याला निष्कारण शिक्षा झाल्याचे उघडकीस येते व मग त्याला, दीर्घकाळ शिक्षा भोगल्यावर कां होईना, निर्दोष ठरवून मुक्त केले जाते. मधूनमधून अशा केसेसबद्दल वाचावयास मिळते. आजच्या New York Times मध्ये अशीच एक केस आली आहे. मायकेल मॉर्टन नावाच्या व्यक्तीला २५ वर्षे शिक्षा भोगल्यावर DNA पुराव्याच्या आधारे निर्दोष ठरवून तुरुंगातून मुक्त केले गेले आहे.
खरी धक्कादायक बाब ही कीं मुळात त्याच्याविरुद्धचा पुरावा संशयास्पदच होता आणि ही गोष्ट पोलिसाना व सरकारी वकिलाला माहीत होती. पोलिसांच्या रेकोर्ड मध्ये दुसरयाच कोणावर तरी संशय घेण्यास सबळ कारण असल्याच्या नोंदी होत्या. त्या दडपून ठेवल्या गेल्या. येथील कायद्या प्रमाणे ही गोष्ट आरोपीच्या वकिलाला सांगणे सरकारी पक्षावर बंधनकारक असूनही तसे केलेले नव्हते. त्यामुळे आता याला जबाबदार असलेल्या त्या सरकारी वकिलावर – जो आता कोठेतरी स्वत:च जज्ज झाला आहे! – कायदेशीर कारवाई करण्याची मागणी Michael Morton तर्फे केली गेली आहे.

1 comment:

  1. फडणीस साहेब,
    आपले अमेरिकेतील हे नवनवीन अनुभव आम्हा वाचकां साठी चालू घडीतील सध्याच्या अमेरिकेची ओळखच असते. आपण ज्या शैलीने ती नेमक्या नि मोजक्या शब्दात चपखलपणे मांडता ती पद्धत हि खूप छान असते. आपणास धन्यवाद,

    ReplyDelete