Saturday, December 10, 2011

दहन कीं दफन?

हिंदू धर्माप्रमाणे मृत व्यक्तीच्या देहाचे दहन करणे हा सर्वमान्य आचार आहे. काही जातीत वा समाजात अपवादाने मृत देह पुरला जातो. मुसलमान व ख्रिस्ती धर्माचा मान्य आचार दफन हा आहे.
अमेरिका हे राष्ट्र मुख्यत्वे ख्रिस्ती धर्मियांचे आहे. येथला सर्वमान्य आचार त्यामुळे पूर्वापार दफन हाच चालत आलेला आहे. अजूनही तशीच परिस्थिती चालू असावी अशी माझी समजूत होती. येथे उघड्यावर, लाकडांच्या चितेवर दहन शक्यच नाही. मात्र कोठेकोठे इलेक्ट्रिक शवदाहिनी बनल्या आहेत असे वाचलेले होते.
आजच्या न्युयॉर्क टाईम्स मध्ये एक लेख वाचनात आला. वाचून नवलाच वाटले.
येथेही आता दफना ऐवजी दहन बरे अशी संकल्पना मुल धरू लागली आहे. मृत्युनंतर देह राखून ठेवला पाहिजे असे आता ख्रिस्ती समाजामध्येही आवश्यक वाटत नाही. हिंदू धर्मातील देह आणि आत्मा याबद्दलच्या संकल्पना आता परिचित आहेत. मात्र, दहन झास्त स्वीकारले जाऊ लागले आहे त्यामागे मुख्य कारण दफन करण्याचे खर्च फार वाढले आहेत व त्यामानाने दहनाच्या सोयी जास्त उपलब्ध व कमी खर्चाच्या ठरू लागल्या आहेत. आर्थिक अडचणी, मृत्युपूर्वी अखेरच्या आजारपणात होणारे डोईजड खर्च यामुळे वृद्ध माणसे स्वत;हूनच सांगून ठेवू लागली आहेत कीं माझ्या मृत्युनंतर परंपरागत अंत्यविधीवर डोईजड खर्च करत बसूं नका, माझे दहन करा!
दहन करण्याची टक्केवारी ४१ वर पोचली आहे. अमेरिकेत एकूण २२०० दहन संस्था आता आहेत!
आर्थिक कारणामुळे का होईना, हा बदल रुजतो आहे!

3 comments:

  1. जमीन आता कमी उपलब्ध होत चालली आहे सर्वत्र .. त्याचा हा परिणाम असावा. पण उद्या झाडे कमी झाली किंवा वीज निर्मिती ठप्प झाली तर माणसांना परत दफनाकडे वळावे लागेल ... किंवा आणखी काही नवे पर्याय शोधावे लागतील.

    ReplyDelete
  2. VIDYUT DAHINI ASLYAVAR KASALI ZADANCHI CHINTA ANI SAUR URJEVAR DAHANBHATTI KARANYACHE PRAYATNAHI SURU HOTILACH KI.

    ReplyDelete
  3. VIDYUT Dahini chya soyee wadhalya pahijet. Tyachyawar America yethe kay sanshodhan chalu ahe ka? Aslyas mala mail karu shakal ka? My mail ID = manmohankasat@gmail.com

    ReplyDelete