Friday, August 19, 2011

पौरोहित्य वर्ग


२५०-३०० विद्यार्थ्याना गणेशपूजेचे शिक्षण देऊन तयार केले गेले आहे व यात बहुसंख्य मुली आहेत अशी एक बातमी वाचली. त्या बातमीवर काही कुशंका आणि कुत्सित टीकाहि वाचनात आली. कल्पना उत्तम आहे. मुलानी पद्धतशीरपणे पूजातंत्राचा व संस्कृत मंत्रांचा व उच्चारांचा अभ्यास केला आहे व त्यासाठी एका पारंपारिक उपाध्यायाने मदत केली हे वाचून त्या व्यक्तीचे अभिनंदनच केले पाहिजे असे वाटले.
हे सर्व छानच आहे पण मला प्रष्न पडला आहे कीं या संस्कृतमंत्रांनी पूजा करण्याच्या अट्टाहासातून आम्ही केव्हां बाहेर पडणार? देवाला संस्कृतशिवाय इतर भाषा कळत नाहीत काय? सर्व मंत्र, कृतिमार्गदर्शन आम्ही मराठीत परिवर्तित कां करत नाही? मग आम्हाला पुरोहिताच्या मध्यस्थीशिवाय पूजा करतां येतील ना? महात्मा फुले सांगून गेले कीं विवाहविधीसकट सर्व धर्मकृत्ये तुम्ही स्वत:च करा. आम्ही अजूनहि संस्कृत मंत्रांच्या कर्मकांडात अडकून पडलो आहोत आणि पुरोहितवर्गाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी धडपडतो आहोत!
वसई भागातील ख्रिस्ती मंडळीनी सर्व कर्मकांडातील लॅटिनचा वापर सोडून देऊन मराठीचा वापर सुरू केला आहे असे वाचले होते. त्याला पोपकडूनहि मान्यता मिळाली आहे असेहि वाचले होते. आम्हाला संस्कृतच्या बरोबर किंवा संस्कृतच्या ऐवजी मराठीचा वापर करावा असे कां वाटत नाही. मराठीतल्या आरत्या, भजने देवापर्यंत पोचतात ना? मग मंत्र कां पोंचणार नाहीत?

1 comment:

  1. अगदी बरोबर काका. आपण शास्त्रात अडकलोत आणि भक्तीच महत्व विसरून गेलोत. घरात धार्मिक विधी केल्या की सर्व बर होईल मग श्रद्धा नसली तरी चालेल, भक्ती नसली तरी चालेल अस बऱ्याच लोकांना वाटायला लागलय. देवाला आमिष दाखवल की आपली दुष्कृत्ये तो पदरात घेईल असही काहींना वाटत.

    ReplyDelete