Sunday, May 29, 2011

मोडी लिपि

अधूनमधून मोडी लिपी शिकण्याबद्दल लिहिले बोलले जाते. मोडी ही मराठी भाषेची एक वेगळी लिपी. देवनागरीपेक्षा भराभर लिहिण्यासाठी जास्त अनुकूल. यामुळे हजारो-लाखो जुनी कागदपत्रे मोडीत लिहिलेली आहेत. आता मोडी लिपि वापरात नसल्यामुळे ही जुनी कागदपत्रे वाचणार कोण असा मोठा प्रष्न आहे. एके काळी इतिहास-संशोधकाना हा प्रष्न पडत नव्हता कारण त्याना मोडी उत्तम येत असे. मराठीत लिहिण्यासाठी देखील कॉंप्यूटरच्या युगात अनेक नवीन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अनेक उत्तम वळणाचे फॉंटहि उपलब्ध आहेत व नवीनहि बनतीलच. खरे तर मोडी अक्षर म्हणजे एक वेगळा फॉंटच समजायला हरकत नाही. तो संगणकावर उपलब्ध झाला तर कोणालाही मोडीमध्ये लिहिता येऊ लागेल! जुने मोडीतील कागद वाचण्याचा प्रश्न मात्र त्यामुळे सुटणार नाही. चार पेन्शनरांनी आणि शाळामास्तरांनी मोडी शिकूनहि तो सुटणार नाहीच! त्यासाठी मोडी ते मराठी Transliteration करणारे Software बनवले गेले पाहिजे. महाराष्ट्रातील आणि जगाच्या पाठीवरील अनेक मराठी संगणक तज्ञ, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातील विश्वविद्यालये, Corporate Bodies यानी मनावर घेतले तर मोडीतील जुना कागद Scan करून तो देवनागरीत Transliterate करणारे Software बनवता येईल. कदाचित सुरवातीला काही शब्द बरोबर बदलले गेले नाहीत तर मोडी जाणणारांसाठी तेवढेच शब्द वाचून दुरुस्त करावे लागतील. असे Software कदाचित Auto Improving होऊ शकेल म्हणजे जसजसे ते वापरले जाईल तसतशी त्याच्या शब्दसंपत्तीत भर पडत जाईल व चुका कमीकमी होत जातील. तंजावर पासून पेशावर पर्यंत अनेक ठिकाणाची मोडीतील दप्तरे याची वाट पाहत आहेत!
हे अशक्य आहे काय? तज्ञानी मला मूर्खात काढण्यास हरकत नाही !

8 comments:

  1. काका... मराठीप्रमाणे मोडीसाठी युनिकोड तयार करण्याचे काम सुरू आहे.. :) माझ्या ओळखीतल्या ४ लोकांकडून मला ह्या कामाबद्दल समजले आहे... मला खात्री आहे की नजीकच्या काळात मोडी संगणकावर झळकू लागेल आणि येतील ते जुने दिवस पुन्हा... :)

    ReplyDelete
  2. धन्यवाद. चांगली बातमी दिलीत. मात्र मला ते जुने (मोडीत लिहिण्याचे ) दिवस पुन्हा येणे अभिप्रेत नाही. संगणकावर मराठीचा वापर सुलभपणे करतां येऊ लागल्यावर मोडीमध्ये कशाला लिहावयाचे? खरी गरज आहे ती जुने मोडी कागदपत्रे वाचण्याची! तीही इतिहास संशोधक लोकांची! सर्वसामान्याना मोडीचे काही देणेघेणे उरलेले नाहीं ही वस्तुस्थिती आहे. मराठीमध्ये चांगले व शुद्ध लिहा म्हणजे झाले! 'युनिकोड मोडी झिंदाबाद' !

    ReplyDelete
  3. माझी 'Modee Transliteration Software' ची कल्पना आपल्या मित्रांच्या नजरेस आणाल काय? शक्याशक्यता तरी कळून येईल!

    ReplyDelete
  4. मोडी लिपीबाबतचा आपला हा लेख आवडला.मला मोडी लिपी शिकायची आहे.ती शिकायची सोय आंतरजालावर करता येईल का ? त्यानंतर त्या लिपीत युनिकोडवर लिहिता येणे जमले तर उत्तम. आपल्या या सूचनेबद्दल आभार. याबाबतची वाटचाल कशी होते, ते पाहू.
    मंगेश नाबर.

    ReplyDelete
  5. संगणकावर मोडी टाईप दोऊ शकते. त्यासाठी मोडी लिपी या संकेतस्थळावर जावे.

    ReplyDelete
  6. www.modilipi.com या साईटवर मोडी शिकण्याची सोय आहे पण मोडी टायपिंगची सोय दिसली नाहीं.

    ReplyDelete
  7. मोडी लिपी पुनर्रूज्जीवनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मोडी लिपी करीता युनिकोड फाँट सुद्धा तयार झाला आहे. साधारण महिन्याभरात तो सर्वांना उपलब्ध होईल. मोडी लिपीत ग्रंथ लेखन सुद्धा सुरू झाले आहे.

    मोडी लिपी करीता transliteration software जतयार होणे जवळ जवळ अशक्य आहे. जेवढे लेखक तेवढया लेखन पद्धती अस्जही अपकिर्ती मोडी लिपीला प्राप्त आहे.

    मोडी लिपी बाबत ताज्या घडामोडींकरीता या मोडी लिपी समूहास नेहमी भेट द्या - https://www.facebook.com/groups/123786634305930/?ap=1

    ReplyDelete
  8. मला शिकायची आहे मोड़ी कुठे शिकू

    ReplyDelete