Sunday, July 3, 2011

बातम्यांची विश्वासार्हता

बातम्यांची विश्वासार्हता
आजकाल वर्तमानपत्रात बातम्या देताना पुरेशी काळजी घेतली जात नाही. काही तांत्रिक विषय असला तर मग आनंदच! कालपरवा, मुंबईत मोनोरेलच्या बांधकामात अपघात झाला व कामगार जखमी / मृत झाले. एका बातमीप्रमाणे मोनोरेलचे बीम दोन टोकाच्या टॉवर्सवर चढवत असताना अपघात झाला. बीमचे टोक सपोर्टवर योग्यठिकाणी बसवण्यासाठी दोन कामगार बीमवर चढलेले होते. बीम सटकल्यामुळे व हादरल्यामुळे ते बीमवरून ३५ फुटावरून खाली कोसळले व मेले. तशाच कारणामुळे इतरानाही इजा झाली असावी. बातमी मात्र ’बीम कोसळून अपघात’ अशी होती. प्रत्यक्षात बीम जमिनीवर कोसळले काय, बीम अंगावर कोसळल्यामुळे कामगार मेले / जखमी झाले काय. बीम मोडले काय, बीम उचलणार्‍या क्रेन्सचे वायररोप तुटले काय, क्रेन्सचे ब्रेक फेल होऊन बीम खाली आदळले काय, या कशाचाहि उलगडा तीन वर्तमानपत्रात बातमी वाचूनहि मिळाला नाही. बीम खरोखरी मोडले किंवा जमिनीवर कोसळले काय याबद्दल मला शंकाच आहे. कोणकोण कशीकशी वौकशी करणार आहे याचेच वर्णन बातमीत जास्त होते! बातमीदाराना खरोखरी काय झाले हे कळलेच नाही कीं जाणून घेण्याची व वाचकाना कळवण्याची इच्छाच नाही देव जाणे!

2 comments:

  1. मला हि तोच प्रश्न पडला होता ,नक्की काय झाले ते कळत नाही

    ReplyDelete
  2. रविवार सकाळने ३-७-११ च्या अंकात माहीम पोस्टांतील एक तथाकथित गैरप्रकार उघडकीस आणला. पण त्याला कोणीही दुजोरा दिलेला नाही.

    ReplyDelete