Thursday, January 15, 2015

पानिपतची लढाई कधी झाली?


पानपतावर भाऊसाहेब पेशवा उत्तरायण सुरू होण्याची वाट पहात बसला होता. सैन्याची उपासमार होत होती. मकरसंक्रांत झाली आणि दुसर्‍या दिवशी मराठी सैन्य 'गोल बांधून' तळ सोडून निघाले. मात्र अबदालीच्या सैन्याला बगल देऊन निसटून जाणे शक्य नव्हतेच. अखेर लढाई झालीच व संध्याकाळपर्यंत मराठी सैन्याचा पूर्ण पराभव झाला. या लढाईला १४ जानेवारीला २५० वर्षे झाली असे म्हटले जात आहे. उत्तरायणाचा व संक्रांतीचा मेळ हजारो वर्षांपूर्वी असला तरी आता फार अंतर पडलेले आहे. दर ७०-७२ वर्षांनी संक्रांत एक दिवसाने पुढे जात आहे. २६००० वर्षांमध्ये पूर्ण ३६५ दिवस पुढे जाईल. गेल्या काही वर्षांत ती १४ जानेवारीला येत असली तरी यंदा १५ जानेवारीला सरकली आहे व आता १५ तारीख कायम होणार आहे. २५० वर्षांपूर्वी ती १०-११ तारखेला झाली असली पाहिजे. मग लढाईची तारीख १२-१३ जानेवारी असली पाहिजे. मग खरी तारीख कोणती? मराठी कागदपत्रांत तारखेचा उल्लेख नसेल कदाचित पण इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीझ, डच पत्रव्यवहारांत एवढ्या मोठ्या घटनेची तारीख नक्कीच नोंदली गेली असली पाहिजे. हे कोडे कोणी उलगडील काय?

1 comment:

  1. वरील लेख लिहिल्यानंतर पानिपतच्या लढाईबद्दल Wikipedia वर शोध केला तेव्हा असे दिसले कीं लढाई १४ जाने. १७६१ ला झाली याबद्दल शंकेला जागा नाही. त्या साली मकरसंक्रमण व आपल्या कल्पनांप्रमाणे उत्तरायण कधी झाले याबद्दल निश्चित माहिती पंचांगकर्ते साळगांवकर वा दातेच देऊं शकतील. मात्र २५० वर्षांपूर्वी संक्रांत १४ जानेवारीला झाली असणे शक्य नाही. ती ११ तारखेला झाली असली पाहिजे. सदाशिवराव भाऊने संक्रांत झाल्यावरहि एक-दोन दिवस भवति-न-भवति करण्यात घालवले व १४ तारखेला अखेर तळ सोडला असे दिसते.

    ReplyDelete