Monday, August 27, 2012

हाफवे-हाउस आणि रेल्वे-प्रवास

हाफवे-हाउस
अमेरिकेत हा एक तुरुंगाचाच प्रकार आहे. अमेरिकन तुरुंगांत फार गर्दी झाली आहे. शिक्षा झालेले वा तपासणी/खटला चालू असलेल्यांनी prizons and jails भरून वाहत आहेत. त्यामुळे किरकोळ गुन्हा केलेले / आरोप असलेले व सराईत गुन्हेगार / दीर्घकाळाच्या शिक्षा झालेले हे सर्व एकत्रच संभाळावे लागतात व परिणामी किरकोळ गुन्हेगार हळूहळू सराईत बनतात!
शिक्षा संपत आलेल्या गुन्हेगारांना संभाळण्यासाठी Halfway House हा प्रकार वापरला जातो. हे सरकार चालवत नाही तर खासगी कंपन्या चालवतात. प्रत्येक गुन्हेगारागणिक सरकार त्याना पैसे देते. अर्थात हा खर्च, गुन्हेगाराला सरकारने स्वतः संभाळण्यापेक्षा कमी असतो! या ठिकाणी सुरक्षा फारशी कडक नसते. गुन्हेगाराला शिक्षणासाठी वा व्यवसायासाठी बाहेर जाण्याची मुभा असते. गुन्हेगार पळून गेला तर त्या कंपनीने पोलिसाना कळवले कीं त्यांचे काम संपले, पकडण्याची जबाबदारी पोलिसांची!
मात्र तपासणी-सुनावणी चालू असलेल्या आरोपीना तेथे पाठवता कायद्याप्रमाणे येत नाही. नेवार्कमध्ये १२०० व्यक्तींची सोय असलेल्या अशा Delaney Hall नावाच्या ठिकाणी असे आरोपीहि पाठवले गेल्याचे आढळले आणि त्याबाबत एक खटला चालू आहे. हे Halfway House जी कंपनी चालवते तिच्यावर ख्रिस ख्रिस्ती या गव्हर्नरचा वरदहस्त आहे म्हणे! ही कंपनी अशी अनेक Halfway Houses चालवण्याचा धंदा करते!
भारतात अशी कंपनी कधीतरी निघेलच!
अमेरिकेत रेल्वे प्रवास.


अमेरिकेत सर्वत्र प्रवास हा बहुतांशी स्वतःच्या गाडीने किंवा जास्त अंतर असेल तर विमानाने केला जातो. क्वचित बसचा वापर होतो. पण रेल्वेचा वापर फार तुरळक.
मात्र गेल्या काही वर्षांपासून काही विशिष्ट ठिकाणी रेल्वे पुन्हा पाय रोवू लागली आहे असे वाचले. विमान प्रवासास जरी वेळ थोडा लागत असला तरी फार वाढलेलीं भाडीं, सुरक्षा-व्यवस्थेच्या अनेक कटकटी, आणि अनेकदां अनेक कारणानी विमान प्रवासात होणारा खोळंबा यामुळे रेल्वेने जाणे बरे असे काहीना वाटते. रेल्वेची तिकिटे OnLine मिळू लागली आहेत, रेल्वेचा वेग वाढला आहे आणि रेल्वे प्रवासात कॉम्प्यूटरचा व फोनचा वापर सुलभ झाला आहे त्यामुळे प्रवासाचा वेळ सत्कारणी लावता येतो यामुळे रेल्वेकडे लोक वळत आहेत.
न्यूयॉर्क-वॉशिंग्टन, आणि न्यूयॉर्क-बोस्टन या दोन मार्गांवर Amtrak ची सर्विस जलद आहे. एके काळी विमान कंपन्यांच्या शटल-सर्विसेसची मक्तेदारी असलेल्या या मार्गांवर आता ७५% व ५४% प्रवाशांची पसंती Amtrakला मिळत आहे! रेल्वे स्थानकाला पोचणे वा प्रवास संपल्यावर इच्छित ठिकाणी जाणे विमानतळावर जा-ये करण्यापेक्षा जवळ व सुलभ होते हेहि एक कारण असेल.मात्र Amtrakचे डबे, इंजिने, रूळ वगैरे सर्व जुनीं झालीं आहेत. वेग वाढवण्यासाठी बराच भांडवली खर्च करावा लागणार आहे. त्यावर Amtrakची गाडी अडते आहे! रिपब्लिकन पक्षाचे सरकार आले तर Amtrakचे काही खरे नाही!

No comments:

Post a Comment