Wednesday, August 15, 2012

मेक्सिकालि आणि सायमन बोलिव्हार

मेक्सिकालि
मेक्सिको देशातील हे एक लहानसे शहर कॅलिफोर्निया-मेक्सिकोच्या सरहद्दीपलिकडे आहे. अशा शहरांना भेट देणारे अमेरिकन बहुतेकजण काही ‘मौज’ करण्यासाठी जात असतात. मेक्सिकालिची गोष्ट थोडी वेगळी आहे. येथे येणारे लोक काही वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी येतात! गेल्या काही वर्षात अशा लोकांची संख्या हजारोंनी वाढते आहे. अमेरिकेत अशा सेवा ज्याना परवडत नाहीत ते येथे येतात आणि दंतवैद्य सेवा, डोळ्याची ऑपरेशने, गॅस्ट्रिक-बायपास वगैरे कमी खर्चात करून घेतात! (यातील काही सेवा इन्शुरन्समध्ये मिळत नसल्यामुळे स्वखर्चाने घेतल्या तर अमेरिकेत अतिशय महाग पडतात) कॅलिफोर्नियातील मेक्सिकनच नव्हे तर अमेरिकेच्या दूरच्या भागातील ्मेक्सिकन व इतर नागरिकहि येतात!
मेक्सिकली शहराला गेल्या वर्षी १,५०,००० अमेरिकनानी भेट दिली व वैद्यकीय सेवा, राहण्या-खाण्याचा खर्च वगैरे मिळून ८० लाख डॉलर शहरात ओतले! शहरात अनेक कन्सल्टंट व हॉस्पिटले आहेत. पेशंट लोकांसाठी अनेक हॉटेल-मॉटेल्स आहेत. गाड्या घेऊन सरहद्द ओलांडणार्‍या अमेरिकनांच्या सोयीसाठी सरहद्दीवर त्यांचे पेपर्स तपासण्यासाठी खास फास्ट-लेन केल्या आहेत! आधीपासून मेक्सिकालीतील डॉक्टर-हॉस्पिटलशी संपर्क करून त्यांचे ऑपरेशन ठरल्याचे पत्र घेतले असेल तर अतिशय लवकर सरहद्दीवर प्रवेश मिळतो! अशा अनेक प्रकारानी सेवा पुरवून मेक्सिको अमेरिकनांकडून पैसे मिळवीत आहेच पण पूर्वी गरीब मेक्सिकन बेकायदा अमेरिकेत प्रवेश करून वैद्यकीय सेवा सर्रास मिळवीत त्याची ही परतफेडच म्हटली पाहिजे.
भारत अमेरिकेपासून फार दूर आहे नाहीतर भारतालाही हा मार्ग उपलब्ध झाला असता!

सायमन बोलिव्हार.
व्हेनेझुएला या राष्ट्राचा सायमन बोलिव्हार हा स्वातंत्र्यसेनानी. भारतात गांधी-नेहेरूना जो मान दिला जातो तसाच मान त्याला व्हेनेझुएलात आहे. प्रत्येक शहराच्या मुख्य चौकाचे नाव बोलिव्हार असते.देशाच्या नाण्याचे नाव बोलिव्हार, मुख्य रस्त्यांना त्याचेच नाव. प्रमुख विमानतळाला त्याचेच नाव, युनिव्हर्सिटीलाहि आणि देशातील एका प्रमुख प्रांताला आणि सर्वात उंच पर्वतालाहि! सध्याचा व्हेनेझुएलाचा डिक्टेटर ह्युगो चाव्हेझहि त्यालाच मानतो!
भारतीयाना अर्थात याचे नवल वाटण्याचे कारण नाही! मात्र आम्ही आता गांधी नेहेरूना सोडून इंदिरा-राजीव गांधींपर्यंत पोचलो आहोत! पुढे राहुल आहेच.

2 comments:

  1. आम्हाला गांधी सोडून कोणीच दिसत नाही,कारण आमचे देशात'आंधळं दळतयं अन् कुत्र पीठ खातय' अशीच स्थिती आहे

    ReplyDelete
  2. लेख छोटाच असल्याने ऑफिस मध्ये पटकन वाचून झाला. पण वाचल्याचे समाधान पण मिळाले. आपण सगळ्यांनीच पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यापेक्षा काही चांगले शिकले तर नक्कीच काही सुधारणा होईल .

    ReplyDelete