रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं. अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे. वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे.
Friday, September 21, 2012
रशियन गॅस आणि दाभोळ बंदर.
रशियन गॅस
रशियामध्ये नैसर्गिक वायु (Natural Gas) फार मोठ्या प्रमाणावर मिळतो. इतका कीं देशाची गरज भागून तो मोठ्या प्रमाणावर निर्यातहि केला जातो. गॅझप्रॉम या सरकारी कंपनीला याबाबत सर्वाधिकार आहेत. मुख्यत्वे ही निर्यात पूर्व-युरोपीय देशांना होते. त्यासाठी पाइप-लाइन्स टाकलेल्या आहेत. काही थोड्या प्रमाणावर रशिया हा गॅस जपानलाहि विकतो. जपानची उर्जा-भूक मोठी आहे व अणुविद्युत केंद्रांच्या अडचणीमुळे जपानला मिळेल तेवढा रशियन गॅस हवाच आहे.
व्लाडिओस्टॉक या शहराचे नाव आपण कधीतरी वाचलेले असते. हे रशियातील सर्वात पूर्वेकडील बंदर आहे. प्रख्यात ट्रान्स-सैबेरियन रेल्वेचे हे अतिपूर्वेकडील अखेरचे स्टेशन आहे. गॅझप्रॉम आणि जपान सरकार यांच्यात हल्लीच एक करार झाला. त्या अन्वये येथे गॅझप्रॉम १३ बिलियन डॉलर खर्च करून एक गॅस टर्मिनल बांधणार आहे. मग समुद्रमार्गे येथून मोठाल्या जहाजातून Liquified Natural Gas (LNG) जपानला रवाना होईल.
रशिया व जपान हे एकेकाळचे कट्टे शत्रु पण आर्थिक गरजा सर्वांवर मात करत असतात!
भारतातहि परदेशातून LNG आणण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी मोठाल्या जेटी बांधण्यात आल्या आहेत व नवीनहि बांधल्या जात आहेत असे वेळोवेळी वाचनात येते. ENRON मुळे बदनाम झालेल्या दाभोळ बंदरातहि अशी एक मोठी जेटी कार्यान्वित झाल्याचे वाचले होते मात्र काही अडचणी आल्यामुळे ते काम बंद पडले होते. पुढे दाभोळपासून कर्णाटकापर्यंत गॅस नेण्यासाठी पाइपलाइन टाकली जाणार असेहि वाचले होते. मुळात हा गॅस दाभोळच्या पॉवरस्टेशन साठी वापरावयाचा होता. पण आता? आता दाभोळ महाराष्ट्रात, गॅस कर्णाटकात, सरकार आनंदात!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment