तेल आणि पाणी
जगातील यापुढील काळातील झगडे वा युद्धे पाण्यासाठी होतील असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय काही बातम्यातून नजरेला येऊ लागला आहे.
अमेरिकेत काही भागात दुष्काळी परिस्थिति आहे व पाण्याची टंचाइ जाणवत आहे असे बर्याच बातम्यांतून जाणवते. त्याचे एक उदाहरण वाचण्यात आले.
अमेरिकेत हल्ली भूमिगत तेलासाठी विहिरी खोदण्याचे काम अनेक भागात चालू आहे. हे भूमिगत तेल हे तेलाच्या कायम वाढणार्या मागणीवरचे उत्तर ठरेल अशी आशा येथे बाळगली जाते. याचे उत्पादन झपाट्याने वाढते आहे. मात्र हे तेल जुन्या तेलविहिरींप्रमाणे जमिनीत खोलवर विहीर खोदल्यावर आपोआप उसळी मारून वर येत नाही. शेल नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या खडकात हे दडलेले असते व ते खडक फोडून मिळवावे लागते व त्यासाठी अतिशय उच्च दाबाने त्या खडकात पाणी चेपावे लागते. तेल मिळवण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. ज्या भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे तेथेच या विहिरीहि खोदल्या जात आहेत त्यामुळे तेल कंपन्या व त्या भागातील शेतकरी / रहिवासी यांच्यात तणाव निर्माण होतो.
पाण्याच्या उपलब्ध स्त्रोतांचा ताबा मिळवण्यासाठी झगडे होऊ लागले आहेत. तेल कंपन्या पाण्यासाठी वाटेल तेवढा भाव मोजू शकतात आणि म्युनिसिपॅलिट्यांकडून पाणी विकत घेतात. म्यु. ना उत्पन्नाचा नवा मार्ग सापडला आहे पण शहरी नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे! शेतकर्यांनाही पाण्याचे वाढीव भाव परवडत नसल्यामुळे चिंता उत्पन्न झाली आहे.
Matthew Staver for The New York Times
Bob Bellis filled his tanker at a hydrant in Greeley, Colo., in August to supply a drilling site. Lease deals with oil companies are important revenue sources for cities.
फोटोमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या हायड्रंटला पाइप लावून पाणी भरून घेत असलेला टॅंकर दिसतो आहे. टॅंकर भरला कीं ड्रायव्हर तो घेऊन कच्च्या रस्त्याने तेल-विहिरीच्या ठिकाणी जाऊन पाणी विकणार व रिकामा टॅंकर लगेच परत येणार!
भारतात टॅंकर लॉबी हेच करते. ‘दुष्काळ सर्वांनाच आवडतो’ म्हणे.
No comments:
Post a Comment