रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं. अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे. वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे.
Sunday, December 2, 2012
थॉमस जेफरसन
अमेरिकेच्या इतिहासात थॉमस जेफरसनचे नाव विख्यात आहे. स्वातंत्र्ययुद्धाच्या संदर्भात त्याचे नाव जॉर्ज वॉशिंग्टनच्या बरोबरीने घेतले जाते. अमेरिकेचे Declaration of Independence हे त्याने लिहिलेले आहे. त्यात 'That all men are created equal, is a self evident truth’ असे त्याने म्हटले होते. मात्र हे फक्त गोर्या अमेरिकनांपुरतेच मर्यादित होते होते! हे लिहितेवेळी त्याच्या मालकीचे १७५ काळे गुलाम होते! यात काही गफलत आहे असे त्याला कधीच वाटले नाही. गुलामीच्या प्रथेचे त्याने नेहेमीच पूर्ण समर्थन केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि त्याचे आधीहि, जॉर्ज वॉशिंटनने आणि इतर अनेक पुढार्यानी आपल्या गुलामांना मुक्त केले, जेफरसनने ते अखेरपर्यंत मुळीच केले नाही. त्याने गुलाम विकत घेणे व विकणे अखेरपर्यंत चालू ठेवले होते. मृत्युकाळीहि त्याने फक्त पांच गुलामाना मुक्त केले. ते कोण होते? त्याची सॅली हेमिंग्ज नावाची एक गुलाम उपपत्नी होती तिचे ते नातेवाईक होते! इतर २०० गुलामांची लिलावाने विक्री झाली! खुद्द सॅली हेमिंग्ज ही गुलामच राहिली मात्र तिचीं आणि जेफरसनचीं अपत्ये मुक्त झालीं!
जेफरसन ‘दयाळू’ मालकही नव्हता. गुलामाना शिक्षा म्हणून त्यांना त्यांच्या नातेवाईक व मित्रांपासून दूर ठिकाणी तो विकून टाकी! त्या काळीहि ती एक कठोर शिक्षाच होती. गोर्या नागरिकांसाठी सौम्य शिक्षा असावी असे म्हणणारा जेफरसन काळ्या गुलामांना वा मुक्त झालेल्या काळ्याना मात्र कठोर शिक्षाच हवी असे मानी. मुक्त गुलामाना Outlaws ठरवणारा कायदा त्याने मांडला होता. आपल्या राज्यामध्ये कालांतराने गुलामाना मुक्त करणारा कायदाहि त्याने होऊ दिला नाही!
आपल्या शेजार्यालाहि त्याने 'गुलामाना मुक्त करूं नकोस' असाच सल्ला दिला. मुक्त झालेले काळे हे आपली काळजी घेऊ शकणार नाहीत व ते म्हणजे एक Pest च असतात असे त्याचे मत होते. एका १० वर्षांच्या काळात त्याने चैनीसाठी पैसे हवेत म्हणून ८५ गुलाम विकले!अशा अनेक गोष्टी आहेत.
स्वतंत्र झालेल्या अमेरिकन राज्यांमधून गुलामांच्या स्वातंत्र्याच्या प्रगतीच्या आड जेफरसन व त्याच्या बरोबरीचे अनेक स्वातंत्र्यसेनानी आले ही अडचणीची वस्तुस्थिति आहे. ती जेफरसनच्या चरित्रात लेखक लोक जमेल तेवढी लपवत असतात. पण ती नाकारता येत नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनुसूचित जाती-जमातीना आपल्या घटनासमितीने शक्य तेवढा न्याय दिला ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
इतिहासातील कित्येक सत्यं आम्हाला माहितच नसतात किंवा वाकवून वळवून सांगितली जातात. या पोस्टमुळेदेखील थॉमस जेफरसनचा दांभिकपणा उघड होतोय. मी तुमचे रामायण व महाभारतावरील ब्लॉग्ज देखील थोडे थोडे वाचत असते. तुमचे तर्क व विश्लेषण करण्याची पद्धत खूप आवडते. एकदम साधी, सरळ, सोपी.
ReplyDeleteधन्यवाद. एक लक्षात घ्यावे कीं हे सर्व अमेरिकन लोकच त्यांच्या पुस्तकातून व वर्तमानपत्रातून लिहीत असतात. लपवून ठेवीत नाहीत!
ReplyDeleteअच्छा! हे माहित नव्हतं. आपल्याकडे असं उघडपणे लिहिलं तर चालतं का? ब-याचदा आपल्याकडची काही पुस्तकं भारतात निषिद्ध असल्याचं समजत.
ReplyDeleteआपल्याकडे भारतात. विशेषत: महाराष्ट्रात या प्रश्नाला एक निराळीच बाजू आहे.दलितमंडळीची पूर्वी झालेली मुस्क्तटदाबी लक्षात घेउन ही मंडळी आतां विशेषत: सरकारी नोक-यात पांढरपेशांना विशेषत: ब्राह्मणांना कोंडाळे करून छळतात.माझ्या दोन नातेवाईकानी या त्रासाला कंटाळून सचिवालयातील नोकरी सोडून निवृत्ती घेतली.
ReplyDeleteत्यांना मिळणा-या सर्व मागासवर्गीय सवलती जरी आंबेडकरांनी दोन दशकांती बंद कराव्यात असे म्हटले असले तरी ते होणे नाही.शिक्षणातच नव्हे पण प्रमोशन व सिलेक्शनमध्ये हाच निकष कायम चालू राहील व त्यांचे पुढारी त्याचा पाठपुरावा मताकरीतां करतील.काही अर्थाने हे म्हणजे ब्राह्मण वर्गाने पूर्वी केलेल्या पापाचे प्रायश्चीत्तच म्हणायचे ज्यापायी ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वर झाले. हे म्हणजे दुर्जनातर्फे झालेले सत्कृत्यच.