आज सुचलेलं
रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं. अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे. वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे.
Friday, January 23, 2015
नवे मेट्रो- मोनो मार्ग.
Thursday, January 22, 2015
मतलबाचा किनारी मार्ग.
Thursday, January 15, 2015
पानिपतची लढाई कधी झाली?
Sunday, January 11, 2015
कालगणना - पुन्हा एकदा
Thursday, January 8, 2015
भारतातील कालगणना
आपल्या भारतात, इंग्रज किंवा मुस्लिम राजसत्ता येण्याचे आधीपासून शालिवाहन शक आणि विक्रम संवत अशा दोन कालगणना/वर्षगणना चालू आहेत व त्या आजतागायत चालू आहेत. मुस्लिम सत्तेच्या काळात हिजरी सनाचा उपयोग होत असला तरी या वर्षगणना आपले स्थान धरून होत्या. इंग्रजी अमलात मात्र इसवी सनाने सत्तेच्या आश्रयामुळे प्रमुख स्थान पटकावले व या दोन्ही कालगणना धार्मिक व्यवहारापुरत्याच वापरल्या जात होत्या. इसवी सनाच्या जगव्यवहारातील स्थानामुळे इंग्रजी अंमल गेला तरी इसवी सन हीच आता प्रमुख कालगणना आपण वापरतो. सणवारांसाठी या जुन्या कालगणना अजून वापरात आहेत हे खरे पण व्यवहारात तारीख हीच खरी हे सत्य नाकारता येत नाही.
जरा विचार केला तर शक, संवत व इसवी सन या तिन्ही गणनांची सुरवात एकमेकांपासून फार दूर नाही. विक्रम संवत सर्वात जुना आहे. मला प्रष्न पडला आहे तो असा कीं विक्रम संवत सुरु होऊन, पहिले, दुसरे, दहावे, बासष्टावे वर्ष अशी गणना सुरू होण्यापूर्वी एखाद्या घटनेचा काळ सांगण्यासाठी काय मार्ग होता? वर्ष हे कालाचे माप निश्चित होऊन अनेक शतके लोटली असणार. मग पहिले, दुसरे अशी गणना सुरू होण्याची समाजाला गरजच भासली नाही? कीं इतर अशी शकगणना पद्धत होती पण ती लुप्त झाली? कां? आणि केव्हा?
युधिष्ठिर शक असे एक नाव मी ऐकलेले आहे पण विक्रमापुर्वीच्या घटनेचा 'युधिष्ठिर शक अमुक'मधील असा उल्लेख कोठे ऐकिवात नाही.
विक्रमसंवत ही गणना तरी कोणी सुरू केली? त्याला तरी अशा गणनेची आवश्यकता कां भासली? समाजाला अशा गणनेची उपयुक्तता कशी जाणवली?
विक्रम संवत व शालिवाहन शक अस्तित्वात असूनहि एकटे शिवाजीमहाराजच असे होऊन गेले कीं 'राज्याभिषेक शक' सुरू करावा अशी प्रबळ प्रेरणा त्याना झाली. मात्र, औरंगजेबाचे परचक्र ३० वर्षांच्या अविरत झगड्यानंतर परतवून लावणार्या मराठी सत्तेला ती कालगणना पुन्हा सुरू करून आपल्या कारभारात तिचा वापर अनिवार्य करावा असे वाटले नाही!
आता काळ फार पुढे गेला आहे आणि इसवी सनाला आता पर्याय नाही.
Monday, January 5, 2015
या ब्लॉगवर गेल्या दीड वर्षात काही नवीन लिहिले नाही. फेसबुकवर काहीबाही लिहिले पण त्याची फारशी दखल घेतली जात नाही असे दिसले. आता पुन्हा ब्लॉग लेखनाकडे वळावे असा विचार आहे. माझे वाचक विखुरले असणारच. त्याना पुन्हा नम्र आमंत्रण कीं वाचा आणि प्रोत्साहन द्या. ब्लॉगवरील लेखनाचे स्वरूप पूर्वी सारखेच राहील.
फडणीस
Wednesday, July 31, 2013
दाभोळचा गॅस
दाभोळच्या गॅस जेटीबद्दल पूर्वी लिहिले होते. त्या जेटीवर गॅसची जहाजे आता लवकरच लागूं लागतील. दाभोळपासून बंगलोरपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम चालू आहे. ही पाइपलाइन अर्थातच महाराष्ट्राच्या तीनचार जिल्ह्यांतून जाईल मात्र वाटेतल्या कोणत्याहि शहराला त्यातून गॅस मिळण्याची सोय असणार नाही. कर्नाटकात मात्र त्या लाइनवरील इतर छोट्यामोठ्या शहरांना गॅस मिळणार आहे. एक पॉवरस्टेशनहि गॅसवर चालणार आहे. एकूण सर्व गॅस कर्नाटकात जाणार आहे. कोची येथे अशीच एक गॅसजेटी बनते आहे. तेथे येणारा गॅसहि केरळ व कर्नाटकातच वापरला जाणार आहे. आंध्रच्या किनार्यावरील एका छोट्या बंदरातहि लिक्विडगॅस आयातीची मोठी सोय बनते आहे. त्या गॅससाठी आंध्र, तामिळनाडु, कर्नाटक वाटणी मागत आहेत.
कुडनकुलम येथील पॉवरस्टेशन सर्व मतलबी विरोधाला न जुमानता अखेर सुरू झाले. त्यासाठी जयललिताने सहकार्य केले, त्याची किंमत म्हणून तेथे निर्माण होणार्या पॉवरचा मोठा वाटा तामिळनाडुला मिळणार आहे व उरलेल्या साठी आंध्र-कर्नाटकानी मोर्चेबांधणी चालवली आहे.
या सार्यात महाराष्ट्र कोठे आहे? आम्हाला काही नकोच आहे! दाभोळची वीज महाग म्हणून नको. गॅसहि नको (वाटा मागितल्याचे वाचनात नाही). एन्रॉन समुद्रात बुडवण्याचे काय झाले? पर्यावरणाचे काही नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही. गुहागर परिसराचे काही नुकसान झाल्याचेहि ऐकिवात नाही. गॅस आयातीची सोय उद्या वाढेलहि पण आम्हा महाराष्ट्रियाना काय त्याचे? गॅस जमिनीखालून कर्नाटकात गेला तर गेला! गोव्यालाहि पाहिजे तर द्या! आम्हाला नकोच.
जैतापुर? नको नको. ७०% वीज महाराष्ट्राला देणार असाल तर जैतापुर चालेल असे कोणाला म्हणावेसे वाटत नाही. महाराष्ट्र गाढ झोपला आहे. क्षुद्र कुरघोडीचे राजकारण व भ्रष्टाचार सर्वाना हवा आहे. जनता अमर आहे.
Subscribe to:
Posts (Atom)