हाफवे-हाउस
अमेरिकेत हा एक तुरुंगाचाच प्रकार आहे. अमेरिकन तुरुंगांत फार गर्दी झाली आहे. शिक्षा झालेले वा तपासणी/खटला चालू असलेल्यांनी prizons and jails भरून वाहत आहेत. त्यामुळे किरकोळ गुन्हा केलेले / आरोप असलेले व सराईत गुन्हेगार / दीर्घकाळाच्या शिक्षा झालेले हे सर्व एकत्रच संभाळावे लागतात व परिणामी किरकोळ गुन्हेगार हळूहळू सराईत बनतात!
शिक्षा संपत आलेल्या गुन्हेगारांना संभाळण्यासाठी Halfway House हा प्रकार वापरला जातो. हे सरकार चालवत नाही तर खासगी कंपन्या चालवतात. प्रत्येक गुन्हेगारागणिक सरकार त्याना पैसे देते. अर्थात हा खर्च, गुन्हेगाराला सरकारने स्वतः संभाळण्यापेक्षा कमी असतो! या ठिकाणी सुरक्षा फारशी कडक नसते. गुन्हेगाराला शिक्षणासाठी वा व्यवसायासाठी बाहेर जाण्याची मुभा असते. गुन्हेगार पळून गेला तर त्या कंपनीने पोलिसाना कळवले कीं त्यांचे काम संपले, पकडण्याची जबाबदारी पोलिसांची!
मात्र तपासणी-सुनावणी चालू असलेल्या आरोपीना तेथे पाठवता कायद्याप्रमाणे येत नाही. नेवार्कमध्ये १२०० व्यक्तींची सोय असलेल्या अशा Delaney Hall नावाच्या ठिकाणी असे आरोपीहि पाठवले गेल्याचे आढळले आणि त्याबाबत एक खटला चालू आहे. हे Halfway House जी कंपनी चालवते तिच्यावर ख्रिस ख्रिस्ती या गव्हर्नरचा वरदहस्त आहे म्हणे! ही कंपनी अशी अनेक Halfway Houses चालवण्याचा धंदा करते!
भारतात अशी कंपनी कधीतरी निघेलच!
अमेरिकेत रेल्वे प्रवास.
अमेरिकेत सर्वत्र प्रवास हा बहुतांशी स्वतःच्या गाडीने किंवा जास्त अंतर असेल तर विमानाने केला जातो. क्वचित बसचा वापर होतो. पण रेल्वेचा वापर फार तुरळक.
मात्र गेल्या काही वर्षांपासून काही विशिष्ट ठिकाणी रेल्वे पुन्हा पाय रोवू लागली आहे असे वाचले. विमान प्रवासास जरी वेळ थोडा लागत असला तरी फार वाढलेलीं भाडीं, सुरक्षा-व्यवस्थेच्या अनेक कटकटी, आणि अनेकदां अनेक कारणानी विमान प्रवासात होणारा खोळंबा यामुळे रेल्वेने जाणे बरे असे काहीना वाटते. रेल्वेची तिकिटे OnLine मिळू लागली आहेत, रेल्वेचा वेग वाढला आहे आणि रेल्वे प्रवासात कॉम्प्यूटरचा व फोनचा वापर सुलभ झाला आहे त्यामुळे प्रवासाचा वेळ सत्कारणी लावता येतो यामुळे रेल्वेकडे लोक वळत आहेत.
न्यूयॉर्क-वॉशिंग्टन, आणि न्यूयॉर्क-बोस्टन या दोन मार्गांवर Amtrak ची सर्विस जलद आहे. एके काळी विमान कंपन्यांच्या शटल-सर्विसेसची मक्तेदारी असलेल्या या मार्गांवर आता ७५% व ५४% प्रवाशांची पसंती Amtrakला मिळत आहे! रेल्वे स्थानकाला पोचणे वा प्रवास संपल्यावर इच्छित ठिकाणी जाणे विमानतळावर जा-ये करण्यापेक्षा जवळ व सुलभ होते हेहि एक कारण असेल.
मात्र Amtrakचे डबे, इंजिने, रूळ वगैरे सर्व जुनीं झालीं आहेत. वेग वाढवण्यासाठी बराच भांडवली खर्च करावा लागणार आहे. त्यावर Amtrakची गाडी अडते आहे! रिपब्लिकन पक्षाचे सरकार आले तर Amtrakचे काही खरे नाही!
रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं. अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे. वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे.
Monday, August 27, 2012
Monday, August 20, 2012
अमेरिकेतील बेकायदेशीर रहिवासी आणि अमेरिकेतील दुष्काळ
अमेरिकेतील बेकायदेशीर रहिवासी
इच्छुकांची गर्दी (न्यूयॉर्क टाइम्समधील फोटो)
अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर (लाखोंनी) परदेशी (मुख्यत्वे मेक्सिकन) घुसखोर रहिवासी आहेत. त्यातील अनेक व्यक्ति अगदी लहान वयात, आपल्या आईवडिलांबरोबर, अमेरिकेत पोचलेले होते. अनेक वर्षे तीं मुले अमेरिकेत राहिलीं, शालेय शिक्षण घेतले, कित्येक जण नोकर्या-व्यवसायहि करत असतात. मात्र तरीहि ते बेकायदा रहिवासीच ठरतात व त्यांचे काय करायचे हा एक वादाचा मुद्दा येथे आहे.
११ वर्षांपूर्वी एक कायदा करण्याचा प्रयत्न झाला ज्यामुळे अशा व्यक्तीना अमेरिकन नागरिकत्व मिळू शकेल. तो कायदा पास होऊ शकला नाही. प्रेसिडेंट ओबामाने आपल्या ‘प्रेसिडेंट’ पदाच्या अधिकारात हल्लीच असा हुकूम काढला आहे कीं अशा व्यक्तीनी सर्व कागदपत्रांसह अर्ज केल्यास व त्या व्यक्तींच्या विरोधी काही गुन्हेगारीचे रेकॉर्ड नसल्यास त्याना दोन वर्षे पर्यंत ‘रहिवासी’पणाचा कायदेशीर हक्क दिला जाईल व त्याना तोपर्यंत उजळ माथ्याने शिक्षण नोकरी वा व्यवसाय करतां येईल. रिपब्लिकन पक्षाचा अर्थातच याला कडवा विरोध आहे. ओबामा निवडून न आल्यास हा कायदा केराच्या टोपलीत जाण्याची जवळपास खात्री आहे! त्यामुळे या नियमाचा फायदा घेण्यास कोणी पुढे येईल काय अशी शंकाच होती. कारण अर्ज करणे म्हणजे आपण ‘घुसखोर’ असल्याचे स्वतःच जाहीर करणे ठरणार! ओबामाने मेक्सिकनांच्या मतांवर डोळा ठेवून हे केले आहे अशी टीका झालीच.
नवलाची गोष्ट म्हणजे, अर्ज करण्याचा दिवस उजाडल्याबरोबर अनेक शहरांतून हजारोंच्या संख्येने अशा ‘घुसखोर’ व्यक्तीनी अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या आहेत. त्याना मदत करण्यासाठी अनेक व्यक्ति व संस्थानी टेबल-खुर्च्या मांडल्या आहेत. अर्ज करणार्या इच्छुकांच्या मुलाखती वर्तमानपत्रे छापताहेत!
दोन वर्षांनंतर, यांतील ज्या हजारोंना, नियमानुसार, तात्पुरती माफी मिळालेली असेल त्यांचे काय होईल? ओबामा प्रेसिडेंट राहिल्यास त्याना देशाबाहेर हाकलले जाईल काय? रिपब्लिकन अध्यक्ष निवडून आला तर त्याला तरी तसे करता येईल का? सर्व अनिश्चित आहे.
अमेरिकेतील दुष्काळ
अमेरिकेत यंदा बर्याच भागात पाऊस खूप कमी पडला आहे त्यामुळे पिकांवर अनिष्ट परिणाम झाला असल्याच्या बातम्या वाचावयास मिळतात. ज्या राज्यांमध्ये मका (Corn) हे महत्वाचे पीक आहे त्या राज्यांत जेव्हां कणसें धरण्यासाठी पाऊस आवश्यक होता तेव्हांच नेमकी पावसाने दडी मारल्याने मक्याच्या पिकावर फार परिणाम झाला आहे. गेली काही वर्षे मका पिकवणारांना फार चांगलीं गेलीं. त्याचे कारण जरा वेगळेच आहे. सरकारी कायद्यामुळे पेट्रोल उत्पादने विकणारांवर बंधन घातलेले आहे कीं पेट्रोलमध्ये ठराविक प्रमाणात एथेनॉल मिसळलेच पाहिजे. हे एथेनॉल येथे मक्यापासूनच बनते त्यामुळे मक्याला मागणी फार वाढली व मका पिकवणारांची चांदी झाली. आता मक्याचे पीक बुडाल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत.
मात्र आजची बातमी वेगळीच आहे. दुष्काळी भागात (Navajo Reservation) चार्याची व पाण्याची एवढी टंचायी निर्माण झाली आहे कीं तेथे घोडे बाळ्गणारांना व त्यांची निपज करणारांना त्याना संभाळतां येत नाहींसे झाले आहे. त्यामुळे घोड्यांना मोकळे सोडून देणे भाग पडत आहे व असे शेकडो-हजारो घोडे मरत आहेत! त्याशिवाय काही विशिष्ट भागात नैसर्गिकपणे मुक्त जन्मणारे व वाढणारे घोडे चार्या-पाणासाठी घोडे बाळगणार्या-वाढवणार्या लोकांच्या तबेल्यांमध्ये घुसूं पाहतात!
समाजकार्य करणार्या काही व्यक्ति वा संस्था घोड्यांवरच्या संकटात त्याना मदत करण्यासाठी सरसावल्या आहेत पण पैसे खर्चूनहि त्यांना चाराच मिळत नाहीं!
बातमी खूप खुलासेवार होती. सर्व हकिगत लिहितां येत नाहीं पण वाचून मन विषण्ण झाले. अमेरिकेतहि भारतासारखेच?

Wednesday, August 15, 2012
मेक्सिकालि आणि सायमन बोलिव्हार
मेक्सिकालि
मेक्सिको देशातील हे एक लहानसे शहर कॅलिफोर्निया-मेक्सिकोच्या सरहद्दीपलिकडे आहे. अशा शहरांना भेट देणारे अमेरिकन बहुतेकजण काही ‘मौज’ करण्यासाठी जात असतात. मेक्सिकालिची गोष्ट थोडी वेगळी आहे. येथे येणारे लोक काही वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी येतात! गेल्या काही वर्षात अशा लोकांची संख्या हजारोंनी वाढते आहे. अमेरिकेत अशा सेवा ज्याना परवडत नाहीत ते येथे येतात आणि दंतवैद्य सेवा, डोळ्याची ऑपरेशने, गॅस्ट्रिक-बायपास वगैरे कमी खर्चात करून घेतात! (यातील काही सेवा इन्शुरन्समध्ये मिळत नसल्यामुळे स्वखर्चाने घेतल्या तर अमेरिकेत अतिशय महाग पडतात) कॅलिफोर्नियातील मेक्सिकनच नव्हे तर अमेरिकेच्या दूरच्या भागातील ्मेक्सिकन व इतर नागरिकहि येतात!
मेक्सिकली शहराला गेल्या वर्षी १,५०,००० अमेरिकनानी भेट दिली व वैद्यकीय सेवा, राहण्या-खाण्याचा खर्च वगैरे मिळून ८० लाख डॉलर शहरात ओतले! शहरात अनेक कन्सल्टंट व हॉस्पिटले आहेत. पेशंट लोकांसाठी अनेक हॉटेल-मॉटेल्स आहेत. गाड्या घेऊन सरहद्द ओलांडणार्या अमेरिकनांच्या सोयीसाठी सरहद्दीवर त्यांचे पेपर्स तपासण्यासाठी खास फास्ट-लेन केल्या आहेत! आधीपासून मेक्सिकालीतील डॉक्टर-हॉस्पिटलशी संपर्क करून त्यांचे ऑपरेशन ठरल्याचे पत्र घेतले असेल तर अतिशय लवकर सरहद्दीवर प्रवेश मिळतो! अशा अनेक प्रकारानी सेवा पुरवून मेक्सिको अमेरिकनांकडून पैसे मिळवीत आहेच पण पूर्वी गरीब मेक्सिकन बेकायदा अमेरिकेत प्रवेश करून वैद्यकीय सेवा सर्रास मिळवीत त्याची ही परतफेडच म्हटली पाहिजे.
भारत अमेरिकेपासून फार दूर आहे नाहीतर भारतालाही हा मार्ग उपलब्ध झाला असता!
सायमन बोलिव्हार.
व्हेनेझुएला या राष्ट्राचा सायमन बोलिव्हार हा स्वातंत्र्यसेनानी. भारतात गांधी-नेहेरूना जो मान दिला जातो तसाच मान त्याला व्हेनेझुएलात आहे. प्रत्येक शहराच्या मुख्य चौकाचे नाव बोलिव्हार असते.देशाच्या नाण्याचे नाव बोलिव्हार, मुख्य रस्त्यांना त्याचेच नाव. प्रमुख विमानतळाला त्याचेच नाव, युनिव्हर्सिटीलाहि आणि देशातील एका प्रमुख प्रांताला आणि सर्वात उंच पर्वतालाहि! सध्याचा व्हेनेझुएलाचा डिक्टेटर ह्युगो चाव्हेझहि त्यालाच मानतो!
भारतीयाना अर्थात याचे नवल वाटण्याचे कारण नाही! मात्र आम्ही आता गांधी नेहेरूना सोडून इंदिरा-राजीव गांधींपर्यंत पोचलो आहोत! पुढे राहुल आहेच.

Subscribe to:
Posts (Atom)